Tuesday, February 16, 2010

आपण पुणेकर कसा ओळखायचा ?


आपण पुणेकर कसा ओळखायचा

पुढील गोष्टींची यशस्वी पुर्तता झाली असेल तर आपणच खरे पुणेकर आहात.
काही नवीन गोष्टी अगर जुन्या असतील तर यात समाविष्ट करा.

.  कितीही गर्दी असली तरी आपण एकदा तरी मंडईतल्या गाळ्यातून भाजी आणली असेल

.ऐन रस्त्यात भर गर्दीत एकदातरी बस किंवा रिक्क्षावाल्याशी  बा -चा- बा-ची  झाली असेल.

.चितळे यांचा कितीही राग आला तरी पाहुणे आल्यावर चितळे यांचीच बर्फी,गुलाबजाम  आणता.

.श्रीकृष्ण मिसळ किंवा बेडेकर यांच्या कडे जाणे येणे होत असेल.

.कितीही वाटले मल्टीप्लेक्स मध्ये जावे तरी तिथूनही तुम्ही वेळात वेळ काढून भरत नाट्य मंदिर किंवा बालगंधर्व, टिळक येथे जात असणार.

.दिवाळी पहाटच बुकिंग आणि कुठलीही लसीकरणाची तारीख, डोस याचं बुकिंग अगदी अदबीने आधी करत असालप्रीकोशन  नाही का! :-) 

.पर्वती,चतुर्श्रुंगी किंवा अगदीच हिंजवडी येथे जाऊन बघून म्हटला असाल "पुणे फारच बदललं बुवा, का ?" .

. आजोबांची जुनी सायकल  किंवा घड्याळ घरात नक्की असेल.

9. घरात आत कपाटात बाबांच्या लग्नचा  कोट नीट घडी करून असेल आणि त्याकडे बघून निरागस हसू पण येत असेल.

१०. आपले लग्न कसे झाले असे विचारल्यावर पटकन लव्ह  किंवा नाही अरेंज्ड झाले किंवा दोन्ही  असे सांगता येत नाही किंवा चक्क लाजता.

११.लग्नात पंगती मध्ये बसताना आधी बायको, मुल, आजी, आई, काकू यांची जागा पकडत असालआणि जाताना त्यांना हळूच "पान तिकडे पलीकडे  आहे असही सांगत असाल".

१२.ज्यांना सरळ आजी आजोबा असे म्हणता येते त्यानं उगाच अति-प्रेमाने "नाना आजोबा ", "आबा", "मामे आजी ", "मावशी काकू " असा म्हणत असाल.

१३.मुलाला स्वतः शिकला  त्याच शाळेत  घालायचा हट्ट  मनात करून शेवटी पुणे आता आय.टी. शिटी होतंय म्हणून इंग्लिश मिडीयम साठी पहाटे पासून शाळेबाहेर बसत असाल.

१४.रंगमंदिरात किंवा थिएटर मध्ये कितीहि उत्तम,प्रतिभावंत  कलाकार असला तरी जो पर्य्नात तुम्हाला ती कलाकारी आवडत नाही तो पर्यंत तुम्ही टाळ्या वाजवत नाही आणि वाजवून देत नाहीआणि कोणी शेजारी पुढे-मागे वाजवल्या तर  त्यांच्याकडे वाकून,मागे वळून  'काय मूर्ख आहे !' असे बघता.

१५.रात्री-अपरात्री कुणी मदतीसाठी बोलावले तर नक्की आवर्जून जाता, पान पुढे आयुष्यभर त्याला त्याची जाणीव ठेवण्यास भाग पडता.आणि याला भाबडेपणा म्हणता.
तुमची काही चुकी नाही हल्ली लोक आपल्या मराठी भाबडेपणाचा फायदाच तर घेत आहेत.

१६.तुम्ही काही प्रक्षोभक वाचून,पाहून(उदा.मी छत्रपती शिवाजी राजेभोसले बोलतोय, पाहून ) कितीही पेटून उठलात तरी संध्याकाळी वेळेवरच जेवता,मुलांना असा करू नये, नीट वागावे अशी चांगली शिकवण देता आणि मनाच्या कोप्रयात  जमेल तेवढे चांगले नक्की आचरणात आणता

१७.महाराष्ट्राचा अभिमान ठेवतो असे नुसते म्हणता तो मनात बाळगता.आणि म्हणूनंच सर्वार्थाने देशाचा.

काही चुकले असेल तर क्षमस्व....पुढे पाठवा...
पुणे सर्वांचे आहेचांगल्या सम विचारांची लाट बना...    


@ copyright  - हर्षल  

No comments:

Post a Comment